रवींद्र कांबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:46+5:302021-08-27T04:24:46+5:30

कोपरगाव : कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयात कार्यरत असलेले राष्ट्रीय चित्रकार रवींद्र कांबळे यांना वैजापूर येथे लोककलावंत सांस्कृतिक मंच, मुंबई ...

State level award given to Ravindra Kamble | रवींद्र कांबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

रवींद्र कांबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कोपरगाव : कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयात कार्यरत असलेले राष्ट्रीय चित्रकार रवींद्र कांबळे यांना वैजापूर येथे लोककलावंत सांस्कृतिक मंच, मुंबई व सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वामनदादा कर्डक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच वैजापूर येथे प्रदान करण्यात आला. प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कांबळे यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहे. त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून एक वेगळी दृष्टी प्राप्त करून दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना त्यांच्या कलाकृती देश व परदेशात पाठवल्या. सामाजिक कार्यात त्यांचा भरीव सहभाग असल्याने त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, रवींद्र साखरे, कार्याध्यक्ष अशोक बागुल, प्रांतकार्यालयाचे कक्ष अधिकारी दीपक त्रिभुवन, परिवहन अधिकारी अक्षय जगधने, आदर्श शिक्षक बलभीम ऊल्हारे, रवींद्र शेलार उपस्थित होते. त्यांचे मूकबधिर विद्यालयाचे अध्यक्ष अशोक रोहमारे स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुधीर डागा, सचिव संजीव कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे, सुजित रोहमारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर गुरसळ यांनी कौतुक केले.

............

फोटोओळी -

वैजापूर येथे रवींद्र कांबळे यांना सपत्नीक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

.......

260821\1450-img-20210826-wa0066.jpg

फोटो२६ - कांबळे पुरस्कार - कोपरगाव

Web Title: State level award given to Ravindra Kamble