शाखेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:04+5:302021-09-08T04:26:04+5:30
नगर तालुक्यातील निंबळक येथे रविवारी कोरगावकर यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे नूतनीकरण व कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा झाला. यावेळी ते बोलत ...

शाखेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवा
नगर तालुक्यातील निंबळक येथे रविवारी कोरगावकर यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे नूतनीकरण व कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सभापती संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, व्ही. डी. काळे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी गाडे म्हणाले,
गाव तेथे शिवसेनेची शाखा हा उपक्रम नगर तालुक्यात एक महिना राबवणार आहोत. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिक करणार आहे. यापूर्वी गावागावात शिवसेनेचे फलक होते. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे हे फलक दिसेनासे झाले. पुन्हा एकदा प्रत्येक गावात शिवसेनेचे फलक लावून जनतेसाठी या शाखेतील पदाधिकारी रात्रंदिवस त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणार आहेत. पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या कामाचे कार्ले यांनी कौतुक केले. पवार यांच्यासारखे कार्यकर्ते शाखेच्या माध्यमातून घडले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी बी. डी. कोतकर,शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी लगड, जालिंदर कुलट, प्रकाश कुलट, भैय्या सप्रे, यांच्यासह निंबळक येथील ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.