कौशल्यात्मक शिक्षण काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:31+5:302021-03-22T04:20:31+5:30

पारनेर तालुक्यात निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने फॅकल्टी इनरिचमेंट प्रोग्राम, कम्युनिकेशन स्किल फॉर प्रोफेशनल या अभ्यासक्रमाचे ...

Skills learning needs time | कौशल्यात्मक शिक्षण काळाची गरज

कौशल्यात्मक शिक्षण काळाची गरज

पारनेर तालुक्यात निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने फॅकल्टी इनरिचमेंट प्रोग्राम, कम्युनिकेशन स्किल फॉर प्रोफेशनल या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.

सागडे म्हणाले, आंतरविद्या शाखेत सर्वांना सर्व विषय शिकता यायला हवेत. आपले कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे. कारण, आंतरविद्याशाखीय शिक्षण काळाची गरज आहे.

प्रा. डॉ. मनोहर एरंडे, प्रा. राम खोडदे, विशाल रोकडे, अंजली मेहेर, संगीता मांडगे, दीपाली जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी इंग्रजी भाषेचे संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी व्यक्तिमत्त्व, निर्णयक्षमता, नावीन्य, लक्ष्य, नवीन आव्हाने, तांत्रिक कौशल्य विकसित करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

इंग्रजी विभागप्रमुख प्रा. स्वाती मोरे, प्रा. आनंद पाटेकर, प्रा. मनीषा गाडीलकर, प्रा. प्रीती कार्ले, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. जनाबाई घेमुड, प्रा. विशाल चव्हाण यांनी नियोजन केले होते. प्रा. सचिन निघूट यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Skills learning needs time