कपाटाचा दर्जा ठरणार महत्वाचा पुरावा

By Admin | Updated: June 25, 2016 00:38 IST2016-06-25T00:29:05+5:302016-06-25T00:38:03+5:30

अहमदनगर : अंगणवाडी सेविकांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या निकृष्ट कपाट खरेदी प्रकरणात सध्या ‘तेरी चूप, मेरी चूप’असे सुरू आहे.

Significant evidence of the status of the cupboard | कपाटाचा दर्जा ठरणार महत्वाचा पुरावा

कपाटाचा दर्जा ठरणार महत्वाचा पुरावा


अहमदनगर : अंगणवाडी सेविकांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या निकृष्ट कपाट खरेदी प्रकरणात सध्या ‘तेरी चूप, मेरी चूप’असे सुरू आहे. महिला बालकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी कपाट खरेदीबाबत कानावर हात ठेवले असून अंगणवाडी सेविका दबावापोटी गप्प आहेत. आता खरेदी करण्यात आलेल्या कपाटाचा दर्जा महत्वाचा पुरावा ठरणार असल्याने प्रशासनाने खरेदी करण्यात आलेल्या कपाटाचा दर्जा तपासणीची मागणी होत आहे.
महिला बालकल्याण विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महिला बालकल्याण आयुक्त कार्यालयाने अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर निधी वर्ग करून किरकोळ दुरूस्ती आणि कपाट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्ह्यातील ३ हजार ६०३ अंगणवाडीमधील सेविकांच्या खात्यावर प्रत्येकी ५ हजार प्रमाणे १ कोटी ८० लाखांचा निधी वर्ग करण्यात आला. मात्र, जिल्ह्यात अनेक तालुक्यात नेमक्या याच संधीचा फायदा महिला बालकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आणि अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला दिसत आहे.
अनेक तालुक्यात अंगणवाडी सेविकांच्या माथी निकृष्ट प्रतीचे कपाट मारण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांकडे पुरवठादार यांच्यामार्फत कपाट पोहोचविण्यात आले असून त्यांच्याकडे थेट निधीची मागणी करण्यात आलेली आहे. नगर तालुक्यात पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात वितरीत झालेल्या कपाटाचा दर्जा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविका आणि महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या चुप्पी मुळे जि.प. प्रशासन अडखळले होते. मात्र, या प्रकरणात कपाटाचा दर्जा महत्वाचा पुरावा ठरणार आहे. कपाटाचा दर्जा खरेदीच्या आदेशानुसार नसल्यास एक तर अंगणवाडी सेविकेने निकृष्ट कपाट खरेदी केले अथवा अधिकाऱ्यांनी दबाब आणून त्यांना खरेदी करण्यास भाग पाडले यातून एक कारण पुढे येणार आहे. यामुळे कपाटाचा दर्जा या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Significant evidence of the status of the cupboard