भाजयुमो दक्षिण जिल्हा सचिवपदी शुभम मोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:24+5:302021-07-30T04:22:24+5:30
मिरी : भारतीय जनता युवा मोर्चाच्या दक्षिण जिल्हा सचिवपदी शुभम सोमनाथ मोटे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे ...

भाजयुमो दक्षिण जिल्हा सचिवपदी शुभम मोटे
मिरी : भारतीय जनता युवा मोर्चाच्या दक्षिण जिल्हा सचिवपदी शुभम सोमनाथ मोटे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील. जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, उपजिल्हाध्यक्ष उमेश भालसिंग आदी उपस्थित होते.
मिरी या छोट्याशा गावातून आलेल्या माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पक्षात काम करण्याची संधी दिली आहे. यापुढील काळात पक्षाचे काम ग्रामीण भागातील तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवणार आहे, असे निवडीनंतर शुभम मोटे यांनी सांगितले.
संतोष शिंदे, एकनाथ झाडे, भागिनाथ गवळी, विष्णू सोलट, राहुल गवळी, राजू शेख, पोपट गवळी, अशोक शिंदे, बाबूराव जमधडे, वैभव शिंदे, सोमनाथ झाडे, श्रीकांत हाटकर, वैभव खलाटे, आदिनाथ सोलट, संजय नवल, चंदू दारकुंडे, जगन्नाथ लोंढे, राजू तागड आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
---
२९ शुभम पोटे