श्रीरामपूर पालिकेचे पुरस्कार प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:22+5:302021-09-25T04:20:22+5:30
कोविडकाळात पोलीस कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता काम केले. त्यांना ‘कोविड योद्धा’ संबोधले जाते, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मनोज ...

श्रीरामपूर पालिकेचे पुरस्कार प्रेरणादायी
कोविडकाळात पोलीस कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता काम केले. त्यांना ‘कोविड योद्धा’ संबोधले जाते, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. डॉ. दीपाली काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
शहरातील डॉ. एन. जी. चौधरी, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, डॉ. वसंत जमधडे, शशिकांत कडूस्कर, शामसुंदर शहाणे, डॉ. गोरख बारहाते, डॉ. विनायक मोरगे, सिस्टर फिलोमीना, डॉ. महेश क्षीरसागर, डॉ. प्रदीप टिळेकर, डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. संकेत मुंदडा, डॉ. सचिन पर्हे, डॉ. बाबूराव उपाध्ये, पोलीस कर्मचारी संजय पवार, सुधीर हापसे, मनोज ओझा यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
संतोष मते यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी प्रास्तविक केले. प्रकाश ढोकणे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेविका वैशाली चव्हाण, ताराचंद रणदिवे उपस्थित होते.
---------
फोटो ओळी : पुरस्कार
श्रीरामपूर भूषण पुरस्काराच्या वितरणप्रसंगी जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील, नगराध्यक्षा अनुराधा आदिक व पुरस्कारार्थी उपस्थित होते.
-------
---------