मेंढपाळ महिलेवर अत्याचार

By Admin | Updated: September 4, 2024 14:28 IST2014-05-21T00:08:48+5:302024-09-04T14:28:46+5:30

संगमनेर : मेंढपाळ महिलेचे तोंड बांधून जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा नराधम आरोपी गणपत भाऊराव काळे(वय ४२), रा. कौठे मलकापूर याच्याविरूध्द घारगाव पोलिसांनी

Shepherd woman tortured | मेंढपाळ महिलेवर अत्याचार

मेंढपाळ महिलेवर अत्याचार

 संगमनेर : मेंढपाळ महिलेचे तोंड बांधून जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा नराधम आरोपी गणपत भाऊराव काळे(वय ४२), रा. कौठे मलकापूर याच्याविरूध्द घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. पोलिसांची माहिती अशी, पठार भागातील कौठे मलकापूर येथे एक २२ वर्षीय मेंढपाळ महिला राहत होती. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आरोपी गणपत काळे याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून तिचा हात धरला. या प्रकाराने घाबरून गेलेल्या महिलेने हात झटकून साकुर शिवारातील विठ्ठल गाडेकर यांच्या घराच्या दिशेने पळ काढला. मात्र आरोपी काळे याने पाठीमागून पळत येऊन सदर महिलेस पकडले. स्वत: जवळील रूमालाच्या सहाय्याने तिचे तोंड बांधून उचलून तिला गाडेकर यांच्या कोबीच्या शेतात नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी अत्याचारित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी आरोपी काळे याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास उपनिरीक्षक विशाल गिरी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shepherd woman tortured