शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न आपण सोडवू-शरद पवार; आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:56 IST

कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

कोपरगाव : कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.सोमवारी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. व्यासपीठावर उमेदवार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, संजीव भोर, चैताली काळे, स्नेहल शिंदे, स्वप्नजा वाबळे, पदमकांत कुदळे, डॉ.अजय गर्जे, माजी नगराध्यक्ष  मंगेश पाटील, सुनील गंगूले, सलीम पठाण, मेहमूद सैय्यद, रमेश गवळी, सुनील बोरा, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संभाजी काळे, माधव खिलारी, अशोक खांबेकर उपस्थित होते. कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, अजय गर्जे, संतोष डागा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार म्हणाले, आशुतोषची निवडणूक पाहिली तेव्हा मला माझी निवडणूक आठवली. आशुतोष आमदार व्हावा, ह्या इच्छेपेक्षा महाराष्ट्रात भविष्यात तयार होणारी तरुण कर्तबगार पिढीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आशुतोष असावा. ७१  हजार कोटी रुपये शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे काम आम्ही केले आणि सर्व शेतकºयांचा उतारा कोरा केला. शेतकºयांना कर्ज दिले, वेळेत कर्ज फेडणाºयांना शून्य टक्के  व्याजदर ठेवला होता. एकावर्षात कर्जमाफी करणारे त्यांना सत्ता देऊन पाच वर्षे झाले मात्र आजपर्यंत पूर्ण कर्जमाफी दिली नाही.  औद्योगिक वसाहती काढून शेतकºयांच्या मुलांना नोकºया उपलब्ध करून दिल्या तसेच सहकार जिवंत ठेवल्याचेही पवार म्हणाले.आशुतोष काळे म्हणाले,  शेतकरी संप मोडीत काढला. आमदार निष्क्रिय आहेत. नगर जिल्ह्यात कर्जत जामखेडसह कोपरगाव निवडून देणार आहे. लाटेवर येणाºया लोकप्रतिनिधी आहे. आमदारकी माझी हौस नाही, जे काही करायचे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019