भाग्यश्री फंडची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:26+5:302021-09-07T04:26:26+5:30
श्रीगोंदा : राज्यस्तरीय २३ वर्षाखालील महिला कुस्ती स्पर्धा इंदापूर येथे पार पडल्या. त्यामध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची खेळाडू ...

भाग्यश्री फंडची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
श्रीगोंदा : राज्यस्तरीय २३ वर्षाखालील महिला कुस्ती स्पर्धा इंदापूर येथे पार पडल्या. त्यामध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची खेळाडू भाग्यश्री फंड हिने ५९ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तिची उमाठी (उत्तर प्रदेश) येथे १६ ते २० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सीनियर विभाग उपप्राचार्य मधुकर खोमणे, डॉ. एल. आर. पाटील, ज्युनियर उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भाग्यश्रीचे यशाबद्दल कौतुक केले. प्रशिक्षक किरण मोरे, हनुमंत फंड, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, क्रीडा संचालिका प्रा. खाडे वैशाली यांचे तिला मार्गदर्शन लाभले.