शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रबळ उमेदवाराच्या शोधात

By admin | Updated: June 18, 2014 01:23 IST

विजय भंडारी, नेवासा मतदारसंघात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून राजकीय घडामोडीही गतिमान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा फायदा होईल

विजय भंडारी, नेवासामतदारसंघात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून राजकीय घडामोडीही गतिमान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा फायदा होईल, या आशेने भाजपा प्रवेश व पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी पक्षाला ‘जय श्रीराम’ करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला़ त्यानंतर तालुक्यात भाजपामध्ये मोठी मरगळ आली होती. मात्र मोदी लाटेनंतर या पक्षात प्रवेशासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत नेवासा तालुक्याचा एकसंध मतदारसंघ झाला़ या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राखण्यात आमदार शंकरराव गडाख गटाने बाजी मारली. मोदी लाटेमुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाकचौरे, घोडेगाव येथील युवक नेते सचिन देसर्डा, माजी आमदार तुकाराम गडाख भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यातील बहुतांशी इच्छुक उमेदवारांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यांच्या निधनाने या इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाला सध्या तरी ‘खो’ बसला आहे. या तालुक्याचे आ. शंकरराव गडाख यांनी मतदारसंघात केलेली कामे, शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी शासन विरोधी भूमिका घेतली़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व तालुक्यात महिला बचत गटाचे नेतृत्व करणाऱ्या सुनीताताई गडाख यांच्या संपर्कामुळे आजमितीस राष्ट्रवादी आणि पर्यायाने गडाख प्रबळ दावेदार समजले जातात.तालुक्यात मनसेचे रोपटेही चांगलेच बाळसे धरु लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाव्य उमेदवार दिलीपराव मोटे यांनीसुद्धा दीड वर्षापासून संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे. त्याचबरोबर सेनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ शेळके, जिल्हा संघटक रामदास गोल्हार यांनीसुद्धा या मतदारसंघावर आपला हक्क सांगत विधानसभेची ही जागा सेनेला मिळावी ही आग्रही भूमिका मांडली आहे. भाजपाची उमेदवारी आपल्यालाच मिळेल या कल्पनेने गेल्या वर्षभरापासून भाजपा कार्यकर्त्यांसह तालुक्याचा दौरा करणारे भाजपाचे अजित फाटके हे सुद्धा आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत आहेत.या सर्व घडामोडी लक्षात घेता नेवासा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात एकास एक उमेदवार देण्याचे मोठे आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे़ भाजपाला उमेदवारी देताना सशक्त उमेदवार शोधावा लागेल. असा तगडा उमेदवार बाहेरील मतदारसंघातील असू शकतो. तसे झाले तर लढत चुरशीची होऊ शकते. राष्ट्रवादीशंकरराव गडाख  ९१४२९भाजपाविठ्ठलराव लंघे  ६९९४३अपक्षतुकाराम गडाख  ५१६६इच्छुकांचे नावपक्षशंकरराव गडाख  राष्ट्रवादीभानुदास मुरकुटे  भाजपाबाळासाहेब मुरकुटे ....दिलीपराव मोटे  मनसेहरिभाऊ शेळके  शिवसेनालोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५१ हजारांचे मताधिक्य