आळेतील निरामय हॉस्पिटल पोलिसांकडून सील; पोलीस कर्मचारी, डाॅक्टर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST2020-12-25T04:16:57+5:302020-12-25T04:16:57+5:30

सुनील यशवंत रत्नापारखी (नेमणूक घारगाव पोलीस ठाणे, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अंमलदाराचे तर डॉ. व्ही. जी. ...

Sealed by Niramaya Hospital police in Ale; Police personnel, doctors pass | आळेतील निरामय हॉस्पिटल पोलिसांकडून सील; पोलीस कर्मचारी, डाॅक्टर पसार

आळेतील निरामय हॉस्पिटल पोलिसांकडून सील; पोलीस कर्मचारी, डाॅक्टर पसार

सुनील यशवंत रत्नापारखी (नेमणूक घारगाव पोलीस ठाणे, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अंमलदाराचे तर डॉ. व्ही. जी. मेहेर (निरामय हॉस्पिटल, आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे पीडितेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. रत्नापारखी व मेहेर यासह अमोल कर्जुले व त्याची आई यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. अमोल कर्जुले याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

सुनील रत्नपारखी हा घारगाव पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची विवाह जुळविण्यासाठी असलेल्या संकेत स्थळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एका घटस्फोटित महिलेशी ओळख झाली होती. या महिलेस दहा वर्षांची मुलगी आहे. रत्नपारखी याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर ते एकमेकांना भेटले. काही महिने हे दोघे सोबत राहिले. या काळात ही महिला गरोदर राहिली. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. आळे येथील निरामय हॉस्पिटल येथे एकदा गर्भपात करण्यात आला. या पीडितेच्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न रत्नपारखी याने केला. तसेच पीडितेस तो जातीवाचक बोलला. अत्याचार करणारा रत्नापारखी, पीडितेचा गर्भपात करणारा डॉ. मेहेर हे पसार आहेत. मेहेर याचे निरामय हॉस्पिटल सील केल्याचे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Sealed by Niramaya Hospital police in Ale; Police personnel, doctors pass