गर्भगिरी डोंगरात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:39+5:302021-08-27T04:24:39+5:30

गर्भगिरी डोंगर कचरामुक्त करण्याची मोहीम हाती घेतली असून भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मढी देवस्थानचे अध्यक्ष तथा ...

Sanitation campaign in Garbhagiri hills | गर्भगिरी डोंगरात स्वच्छता अभियान

गर्भगिरी डोंगरात स्वच्छता अभियान

गर्भगिरी डोंगर कचरामुक्त करण्याची मोहीम हाती घेतली असून भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मढी देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड यांनी केले आहे.

या डोंगरदऱ्यामध्ये अनेक गुहा, निर्जनस्थळे आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या गर्भगिरी डोंगर परिसरात घाणीचे साम्राज्य झाले आहे. हा परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार मढी देवस्थान समिती व ग्रामपंचायत यांनी हाती घेतला असून रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन तात्या मरकड, नवनाथ मरकड, भानुविलास मरकड, गणेश मरकड, किरण मरकड, बाळासाहेब मरकड, आण्णा औटी, संजय केसभट, शरद कुटे, गहिनीनाथ मरकड, वन कर्मचारी विष्णू मरकड, राजेंद्र मरकड, ग्रामपंचायत कर्मचारी दादा पुरी, गोकूळ निमसे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिंगबर मरकड, देवस्थान कर्मचारी अशोक मरकड, राजू मरकड यांनी भाग घेतला.

मढी ते मायंबा दुतर्फा रस्ता, सूर्यकुंड, गोटीबाली व मायंबा घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. मायंबा गडावरून खाली पायी उतरताना रस्त्यामध्ये जो प्लास्टिक कचरा दिसेल तो उचलून जवळ असणाऱ्या गोण्यात गोळा करण्यात येऊन एकूण १० ते १५ मोठ्या गोणी प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

-------

फोटो - २६ गर्भगिरी डोंगर

मढी देवस्थान समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने गर्भगिरी डोंगरावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Web Title: Sanitation campaign in Garbhagiri hills