संगमनेर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा तालुके हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:33+5:302021-07-30T04:22:33+5:30

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, संगमनेर तालुक्यात देखील दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ...

Sangamner, Parner, Pathardi, Shevgaon and Shrigonda talukas hotspots | संगमनेर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा तालुके हॉटस्पॉट

संगमनेर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा तालुके हॉटस्पॉट

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, संगमनेर तालुक्यात देखील दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २९) संगमनेर तालुक्यातील साकूर गावात जिल्हाधिकारी भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी भेट दिली.

संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी विजय आहेर उपस्थित होते.

भोसले म्हणाले, जिल्हा परिषदेच्या साकूर गटातील वीस गावांमध्ये दररोज साधारण ३० ते ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ३१ जुलै ते ८ ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत साकूर गटात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. साकूर भागातील दोनशे ते अडीचशे मजूर जुन्नर तालुक्यात जातात. त्या मजुरांची ग्रामपंचायतनिहाय यादी तयार करण्यात येणार आहे. त्यांची नित्याने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या साकूर आणि आश्वी गटातील वाहनचालक मुंबई, पुणे, नाशिक येथे तक्रारी घेऊन जातात. त्यांच्या विलगीकरणाची सोय केली जाणार आहे.

---------------------

मंगल कार्यालये सील करण्याच्या प्रशासनाला सूचना

मंगल कार्यालयात उपस्थित राहणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी. मर्यादित संख्येपेक्षा जास्त लोक आढळून येणारी मंगल कार्यालये कोरोना संपेपर्यंत सील करण्यात येतील. तसेच दुपारी चार वाजेनंतर सुरू असलेले हॉटेल, बीअर बार, परमिट रूम देखील सील करण्यात येणार आहे. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

Web Title: Sangamner, Parner, Pathardi, Shevgaon and Shrigonda talukas hotspots