रोहित पवारांच्या व्हिजनमुळेच राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:49+5:302021-09-24T04:24:49+5:30

जामखेड : आमदार रोहित पवार यांची कामाची पद्धत, मतदारसंघ, जिल्हा, राज्यासाठी असलेले व्हीजन पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. तसेच ...

Rohit Pawar's vision is the reason for joining NCP | रोहित पवारांच्या व्हिजनमुळेच राष्ट्रवादीत प्रवेश

रोहित पवारांच्या व्हिजनमुळेच राष्ट्रवादीत प्रवेश

जामखेड : आमदार रोहित पवार यांची कामाची पद्धत, मतदारसंघ, जिल्हा, राज्यासाठी असलेले व्हीजन पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. तसेच विकासाला साथ देण्यासाठी माझ्याबरोबरच दोन नगरसेवक, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमधील भाजपचे प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या अनुषंगाने ते जामखेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

आमदार रोहित पवार हेच कर्जत-जामखेडचा सर्वांगीण विकास करू शकतात. त्यांनी केलेल्या कामाने आम्ही प्रभावित झालो आहोत. पक्षापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. स्वप्नातील कर्जत व जामखेड शहर उभे करण्यासाठी तसेच विकासाला साथ देण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमदार रोहित पवार यांच्या कामामुळे स्वच्छेने पक्षबदल केला आहे. आमच्यावर कोणतेच दडपण नव्हते. अगामी कर्जत व जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित आहे. त्यामुळे पानगळीचा किती फायदा भाजपला होईल, हे येणारा काळच ठरवेल असेही यावेळी ढोकरीकर म्हणाले.

220921\4126img-20210921-wa0032.jpg

(फोटो - प्रसाद ढोकरीकर)

Web Title: Rohit Pawar's vision is the reason for joining NCP