भात लागवडीस आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:07+5:302021-07-24T04:14:07+5:30
आदिवासी पट्ट्यात खरिपात भात हे मुख्य पीक घेतले जाते. या परिसरात रोहिणी नक्षत्रात भाताची रोपे टाकली जातात. सव्वा ते ...

भात लागवडीस आला वेग
आदिवासी पट्ट्यात खरिपात भात हे मुख्य पीक घेतले जाते. या परिसरात रोहिणी नक्षत्रात भाताची रोपे टाकली जातात. सव्वा ते दीड महिन्यात त्याची लागवड केली जात असते. या वर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले होते; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली आणि भात लागवडी खोळंबल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीतील पाणी उचलण्याची सुविधा होती अशा काही शेतकऱ्यांनी त्यांची भात लागवडीची कामे उरकली होती. मात्र पावसावर अवलंबून असणारे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. रविवारपासून या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि भात खाचरे तुडुंब झाली.
शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला. त्यातच भात खाचरे भरून वाहू लागल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी आता खोळंबलेल्या भात लागवडीची कामे सुरू केली आहेत.