शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांवर महसूलमंत्री काहीच बोलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:15 IST

राहाता : वाळू माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातूनच गावपातळीवर गुन्‍हेगारी वाढत चालली आहे. या वाळू माफियांवर महसूलमंत्री काहीच ...

राहाता : वाळू माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातूनच गावपातळीवर गुन्‍हेगारी वाढत चालली आहे. या वाळू माफियांवर महसूलमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. सरकारही मूग गिळून गप्‍प आहे. वाळू वाहणाऱ्या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु आहे, असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ हे होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, विखे कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभेपुढे मांडून मंजूर करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांनीही ऑनलाईन हजेरी लावली.

निळवंडेसाठी आपण साईसंस्थानचे ५०० कोटी मंजूर करवून घेतले होते. परंतु काही जण न्यायालयात गेले. निळवंडेचे पाणी गणेश परिसरात आले तर हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. राज्यात माफिया राज सुरु आहे. वाळूवर माफिया पोसायचे आणि माफियांनी गावपुढारी, गुन्हेगारी पोसायची हे काम सुरु असल्याची टीका आमदार विखे यांनी केली. निळवंडेच्या कामांना चालना मिळाल्याबद्दल माजी मंत्री राधाकृष्ण विखे, मधुकरराव पिचड यांच्या अभिनंदनाचा ठरावही सभेत करण्यात आला.

.....