कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:29+5:302021-09-07T04:26:29+5:30

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून हा सोहळा अगदी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ...

Renovation of Kolhaleshwar Mahadev Temple | कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार

कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून हा सोहळा अगदी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ग्रामदैवत भगवतीमाता मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात स्व. शंकरनाना खर्डे यांनी पुढाकार घेतला होता. नंतरच्या काळात कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष स्व. हरिभाऊ जिजाबा खर्डे यांच्या कार्यकाळात श्री. विठ्ठल, श्री. हनुमान आणि नूतन कोल्हाळेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांचे देणगीदार भाविकांचे मोठे योगदान असल्याचे विखे यांनी नमूद केले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसेच माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे यांनीही कोल्हाळेश्वर महादेव मंदिराच्या अप्रतिम कामाबद्दल ट्रस्टच्या विश्वस्तांचे कौतुक केले.

कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे यांनी स्वागत केले. त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती असलेल्या या मंदिराचे वास्तुविशारद अरविंद वैद्य, अभियंता विलास माधवराव खर्डे, कारागीर शफिक मन्सुरी, मूर्तिकार रमेश चौहान यांच्यासह शिवमंदिर उभारणीसाठी सढळ हस्ते देणगी देणाऱ्या दानशूर भाविकांचा आमदार विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ट्रस्टचे विश्वस्त प्रकाशराव खर्डे यांनी प्रास्ताविक केले. तीन दिवस चाललेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नाशिक येथील धर्मभूषण अनिल जोशी यांनी पौरोहित्य केले. जि.प. माजी सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, प्रवरा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोकलाल आसावा, मोहिनीराज देवकर, बाबासाहेब दळे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, साहेबराव दळे, विश्वस्त नंदकुमार खांदे, श्रीकांत खर्डे, बापूसाहेब देवकर, विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, वसंतराव मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Renovation of Kolhaleshwar Mahadev Temple