विसापूर - कोरेगव्हाण रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:35+5:302021-09-25T04:20:35+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ते कोरेगव्हाण रस्त्यावर ठिकठिकाणी लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे ये-जा करताना नागरिकांना अडचणींचा ...

Remove encroachments on Visapur-Koregaon road | विसापूर - कोरेगव्हाण रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा

विसापूर - कोरेगव्हाण रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ते कोरेगव्हाण रस्त्यावर ठिकठिकाणी लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे ये-जा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, ही अतिक्रमणे काढून अडथळे दूर करावेत, अशी मागणी विसापूरचे सरपंच अरविंद जठार व शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विसापूर - कोरेगव्हाण हा शासकीय रस्ता आहे. सध्या दुतर्फा झालेल्या रस्त्याचे अस्तित्व केवळ नावापुरतेच राहिले होते. त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. गेल्या चार वर्षांपासून माजी आमदार राहुल जगताप यांनी लक्ष घालून या रस्त्यासाठी प्रयत्न करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून १ कोटी ८९ लाख रूपयांचा निधी मंजूर केला. या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे काम करताना ठेकेदाराला अडचण येत आहे. या रस्त्याचे भाग्य उजळण्याचा मार्ग मोकळा झाला असताना अतिक्रमणांचे संकट या कामात अडथळा ठरत आहे. त्यामुळे तहसीलदारांकडून या रस्त्याची पाहणी करून अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नीलेश जठार, सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब विनायक शिंदे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र जठार, सेवा सोसायटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, सुखदेव शिंदे, तुषार जठार, दिनेश शिंदे आदींच्या सह्या आहेत.

----

फोटो आहे

240921\img-20210923-wa0072.jpg~240921\img-20210923-wa0070.jpg

विसापूर-कोरेगव्हाण हा अतिक्रमणाचे गर्तेत सापडला रस्ता.~विसापूर-कोरेगव्हाण हा अतिक्रमणाचे गर्तेत सापडला रस्ता.

Web Title: Remove encroachments on Visapur-Koregaon road