शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

फुटेजद्वारे आरोपींची छायाचित्रे जारी

By admin | Updated: June 12, 2024 12:23 IST

अहमदनगर : सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील सॅमसंग कंपनीचे मोबाईल शॉपीच्या दुकानातून चौघांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले

अहमदनगर : सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील सॅमसंग कंपनीचे मोबाईल शॉपीच्या दुकानातून चौघांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले आहे. या फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांची छायाचित्रे जारी केली आहेत.मार्केटयार्ड परिसरातील मुंजोबा स्वीटशेजारी असलेल्या परफेक्ट मोबाईल शॉपीमध्ये सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान चोरी झाली होती. यामध्ये ७ लाख ८८ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी शोरुमचे मालक धीरज शिवदास डागा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शोरुममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता झोपण्यासाठी आल्याचे सोंग घेऊन चोरट्यांनी शोरुमचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते.या फुटेजमध्ये चोरट्यांची छायाचित्रे स्पष्ट दिसत असल्याचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी सांगितले. यामधील आरोपींबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.सीसीटीव्हीमधील चित्रणानुसार दुकानात जाऊन मोबाईल चोरणाऱ्या आरोपीने राखाडी रंगाची ट्रॅकपॅन्ट, गोल गळ््याचा टी शर्ट, फिक्कट पोपटी रंगाचा टी शर्ट असा पेहराव घातलेला आहे. बाहेर असलेला दुसरा आरोपी हा शरीरयष्टीने मजबूत असून त्याने पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट घातलेला आहे. तिसरा आरोपी बरमुडा पॅन्ट व हाफशर्टवर आहे. दोघांकडे सॅक असून सर्वांचे वय २५ ते २८ दरम्यान आहे.(प्रतिनिधी)