रिपाइंची पुनर्बांधणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:58+5:302021-09-24T04:24:58+5:30

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. या वेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते गौतम ...

Reconstruction of Ripai begins | रिपाइंची पुनर्बांधणी सुरू

रिपाइंची पुनर्बांधणी सुरू

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. या वेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते गौतम घोडके, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, विजय भांबळ, कृपाल भिंगारदिवे, गौतम घोडके, रवींद्र आरोळे, अविनाश भोसले, बाळासाहेब शिंदे, विजय बोरुडे, योगेश त्रिभुवन, गौतम घोडके, विशाल घोडके, साजिद पठाण, पप्पू घोडके, भाऊ मगर, दीपक गायकवाड, अमित जाधव, दत्ता कदम, संजय भैलुमे, आकाश तांबे, प्रतीक नरवडे, जयराम आंग्रे, यशराज शिंदे, सुरज भिंगारदिवे, सुलतान सय्यद, चंद्रकांत गोरे, हर्षल कांबळे, भूषण चव्हाण आदी उपस्थित होते. आरपीआयचे ज्येष्ठ नेते गौतम घोडके यांनी युवकांना पक्ष बळकटीकरणाचे आवाहन केले.

.................

आठवले जिल्हा दौऱ्यावर

या बैठकीत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. तसेच भविष्यातील निवडणुका समोर ठेवून चर्चा करण्यात आली.

--------------------------

आरपीआयच्या शहर व तालुक्यातील निवडी -

जिल्हाध्यक्ष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुका पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. चंद्रकांत गोरे यांची जिल्हा प्रमुख संघटकपदी, योगेश त्रिभुवन यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी तर नगरसेवक राहुल कांबळे यांची युवक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच नगर शहर - विजय भांबळ, नगर तालुका - संजय कांबळे, पारनेर - दीपक गायकवाड, श्रीगोंदा - दत्ता कदम, कर्जत - गौतम घोडके, जामखेड - अमित जाधव, पाथर्डी - विजय बोरुडे, शेवगाव - रवींद्र आरोळे यांची पक्षनिरीक्षक म्हणून निवड करण्यात आली.

---------------------------

२३ सुनील साळवे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे. समवेत गौतम घोडके, किरण दाभाडे, राहुल कांबळे, विजय भांबळ, कृपाल भिंगारदिवे, गौतम घोडके, रवींद्र आरोळे आदी. (छायाचित्र : वाजिद शेख)

Web Title: Reconstruction of Ripai begins