शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील पिकांच्या नुकसान भरपाईचे तीन कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यातील गोदावरी नदीला ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : तालुक्यातील गोदावरी नदीला ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनामार्फत पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. त्यातील दुसऱ्या टप्यातील तीन कोटींचे अनुदान नुकतेच तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात ऑगस्ट २०१९ ला गोदावरी नदीने रुद्रावतार धारण केला होता. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावात शेतात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी व इतर सर्वच प्रकारच्या पिकांचे पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीचे तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सूचनेने तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश काढले होते. या महापुरात सुमारे २ हजार ८३ शेतकऱ्यांच्या १५०१.४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची ६ कोटींच्यावर नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी केली होती. त्यापोटी पहिल्या टप्यातील ३ कोटींची रक्कम ही तत्काळ देण्यात आली होती. तर उर्वरित ३ कोटींची रक्कम नुकतीच प्राप्त झाली आहे. हे दोन्ही टप्पे मिळून आतापर्यंत साडेपाच कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांचे बँक खाते व सामायिक खाते असलेल्या शेतकऱ्यांची ५० लाख रुपयांच्या रकमेचे वाटप शिल्लक आहे.

............

या नुकसान भरपाईच्या अनुदातील काही शेतकऱ्यांचे उताऱ्यावर एका पेक्षा जास्त नावे आहेत. अशा शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील कोणा एका व्यक्तीच्या नावावर रक्कम जमा करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार करून कार्यालयात जमा करावे. तसेच काही शेतकऱ्यांनी बँकेचा खाते नंबर दिलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ नंबर द्यावे, त्यांच्या खात्यावर तत्काळ रक्कम जमा करण्यात येईल.

-योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव.