वेळेवर पडलेल्या पावसामुळे या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनीही यंदा वेळेत खरिपाची पेरणी केली होती. यातून सोयाबीन, भुईमूग, बाजरी व इतर पिकांचीही चांगली उगवण झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने तब्बल १५ दिवसांहून अधिक काळ दडी मारली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}कोरडवाहू भाग असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे चित्र निर्माण झाले असतानाच पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी बरसू लागल्याने या पिकांना जीवदान मिळाले आहे. तहानलेला पिकांना संजीवनी मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची रखडलेल्या पेरण्या उरकून घेण्याची लगबगही सुरू झाली आहे.
----------------
सोबत फोटो - १४ धामणगाव
पावसाने हजेरी लावल्याने धामणगाव आवारी भागात घोरपडवाडी परिसरात तरारलेली पिके.
-----