शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे धुमशान.. ३३ टक्क्यांवर पोहोचला कुकडीचा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

आढळगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाच धरणांमध्ये गुरुवारी (दि.२२) दुपारपर्यंत ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या पाणलोट ...

आढळगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाच धरणांमध्ये गुरुवारी (दि.२२) दुपारपर्यंत ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारली होती. परंतु, दोन दिवसांपासून धरणांच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी धरणांमध्ये २१ टक्के पाणीसाठा होता. यंदा १० टक्के अधिक पाणीसाठा आहे.

जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे अशी पाच धरणे कुकडी प्रकल्पात येतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरुर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण सात तालुक्यांमधील १ लाख ५६ हजार २७८ हेक्टर एवढे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली येत आहे. उसाचे आगार ही श्रीगोंदा तालुक्याची ओळख बनविण्यात कुकडीच्या पाण्याचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर तालुक्यात कुकडीच्या आधारावर फळबागांचेही क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यावर या भागातील शेतकऱ्यांचे नियोजन अवलंबून असते.

गेल्यावर्षी तालुक्याच्या कुकडी लाभक्षेत्रात पाऊस भरपूर पाऊस झाला होता. तरीही उन्हाळ्यात कुकडीच्या पाण्याने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांसह ऊस आणि फळबागा धोक्यात आल्या होत्या. कुकडीच्या पाचही धरणांमध्ये गुरुवारी (दि.२२) दुपारपर्यंत १ हजार ९० दशलक्ष घनफूट आवक झाली होती, तर एकूण ८ हजार ८०० दशलक्ष घनफूट आवक झालेली आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९ हजार ८९० दशलक्ष घनफूट (३३ टक्के) आहे. गेल्यावर्षी या दिवशी २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यावर्षी उपयुक्त पाणीसाठा १० टक्क्यांनी जास्त असला तरीही कुकडी प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठ्यासाठी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहण्याची गरज आहे.

---

प्रकल्पातील पाणीसाठा..

येडगाव- १, ४४९.०६ दशलक्ष घनफूट (४८.८३ टक्के), माणिकडोह- ३,१०६.९९ (२३.६४ टक्के), वडज- ७३७.७७ (५४.४५ टक्के), डिंभे- ६,८८३.६७ (४७.०९ टक्के), पिंपळगाव जोगे- ३,१७०.८६ (उणे ३२.१२ टक्के).

----------

कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यामुळे पाणीसाठा वाढत आहे. गुरुवार दुपारपर्यंत ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

-स्वप्निल काळे,

कार्यकारी अभियंता, सिंचन शाखा, श्रीगोंदा.

----

२२ कुकडी

डिंभे जलाशयातील पाणीसाठा.स