विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:22+5:302021-02-23T04:33:22+5:30

नगर तालुक्यातील देवगाव येथे नवजीवन प्रतिष्ठानच्या समन्वयाने नाबार्ड बँक व कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या आर्थिक सहकार्यातून राबविण्यात आलेल्या विकासकामांचे ...

Public participation is important in development work | विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा

विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा

नगर तालुक्यातील देवगाव येथे नवजीवन प्रतिष्ठानच्या समन्वयाने नाबार्ड बँक व कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या आर्थिक सहकार्यातून राबविण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण शेवडे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी नाबार्डचे नगर जिल्हा व्यवस्थापक शीलकुमार जगताप, नाबार्ड पुणे येथील व्यवस्थापक प्रमोद पाटील, लेखापरीक्षक पार्थ सेथिया, सरपंच संभाजी वामन, नवजीवन संस्थेचे राजेंद्र पवार, राजेंद्र भोसले, एस. एच. शेतवाल आदी उपस्थित होते. यावेळी शेवडे यांनी विकासकामांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जगताप म्हणाले, नवजीवन संस्थेच्या माध्यमातून देवगाव येथे विविध विकासकामे तसेच महिला बचत गटामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम उल्लेखनीय आहेत. यावेळी जयकिसान पाणलोट समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव वामन, संजय वामन, रावसाहेब वामन, बचत गट संघटक रंजना वामन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लोकसहभागातून अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच उभारण्यात येणाऱ्या मियावॉकी फॉरेस्टचे भूमिपूजन झाले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य आशा शिंदे, बलभीम वामन, अर्जुन शिंदे, प्रशांत वामन, आदिनाथ वामन, ॲड. गणेश पाटील, सुवर्णा वामन, वैशाली शिंदे, सरस्वती शिंदे, वंदना वामन, रंभाबाई शिंदे, रक्षंदा वामन, वैभवी वामन, ग्रामस्थ व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन महेंद्र वामन यांनी केले. आभार शाम पाटील यांनी मानले.

फोटो २२ कार्यक्रम

ओळी- देवगाव येथे लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या मियावॉकी फॉरेस्टचे नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक यू. एस. शेवडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

Web Title: Public participation is important in development work