मनोरुग्ण, अनाथांना मिळाली ब्लँकेटची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:39+5:302021-02-05T06:34:39+5:30

केडगाव : विभूजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मानव उत्थान सेवा समितीच्या नगर शाखेच्या वतीने नगरमधील विविध रस्त्यांवर फिरणाऱ्या बेवारस, मनोरुग्ण, ...

Psychopaths, orphans get blankets | मनोरुग्ण, अनाथांना मिळाली ब्लँकेटची भेट

मनोरुग्ण, अनाथांना मिळाली ब्लँकेटची भेट

केडगाव : विभूजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मानव उत्थान सेवा समितीच्या नगर शाखेच्या वतीने नगरमधील विविध रस्त्यांवर फिरणाऱ्या बेवारस, मनोरुग्ण, अनाथ, तसेच गतिमंद बालके आणि केडगाव बायपासवरील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास संस्थेतील निराधारांना ब्लँकेट, फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

शहरातील विविध भागात अनेकजण बेवारस, मनोरुग्ण, अनाथ फिरत असतात. त्यांना मायेचा आधार देण्यासाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे. अनेक संस्था सामाजिक भावनेतून हे काम करीत आहेत. मानव उत्थान सेवा समितीची नगर शाखाही त्यापैकी एक आहे. प्रत्येकाने आपल्या कमाईतील खारीचा वाटा या गोरगरीब व निराधारांसाठी दिल्यास त्यांच्या जीवनात सुद्धा आनंद येऊ शकेल. समाजाची सेवा करायला लागलो की, मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा असल्याची जाणीव होते. समाजातील निराधारांना आधार देण्याचे मोठे काम समिती करणार आहे, असे संस्थेचे दत्तात्रय जावळे यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे रतन मोरे, संगीता जावळे, औरंगाबाद हायकोर्टातील वकील वाकळे, संस्था चालक दिलीप गुंजाळ, चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो : ३१ केडगाव ब्लँकेट

नगर शहरातील मानवसेवा प्रकल्प येथे ब्लँकेट वाटप करण्यात आले.

Web Title: Psychopaths, orphans get blankets