जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:16+5:302021-02-25T04:25:16+5:30

श्रीरामपूर : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकीने तालुक्यातील हरेगाव ते उंदिरगाव रस्त्यावरील एका टपरीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ...

Print a gambling den | जुगार अड्ड्यावर छापा

जुगार अड्ड्यावर छापा

श्रीरामपूर : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकीने तालुक्यातील हरेगाव ते उंदिरगाव रस्त्यावरील एका टपरीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपी मात्र पसार झाले.

उपअधीक्षक मिटके यांच्या पथकाने गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून केलेल्या कारवाईत आरोपी सचिन लक्ष्मण गायकवाड (वय ३९) रा.उंदिरगाव), दीपक मेघन भोसले (वय ४५ रा.श्रीरामपूर), मयूर सर्जेराव पगारे (वय २४, उंदिरगाव) हे तिरट खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून ६९ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपींवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पोलीस नाईक अमोल भोईटे, हवालदार रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Print a gambling den