शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ जुलैअखेर दुप्पट म्हणजे ४१ टक्के ...

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ जुलैअखेर दुप्पट म्हणजे ४१ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

कुकडी प्रकल्पात गेल्या वर्षी ६ हजार ५१० एमसीएफटी (२१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा यंदा १२ हजार २३६ एमसीएफटी (४१ टक्के) आहे. यामध्ये डिंभे धरणात सर्वाधिक पाणीसाठा आहे.

कुकडी नदीवरील येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ हजार १२३ एमसीएफटी (५८ टक्के) इतके पाणी आले आहे. सध्या पाऊस कमी झाला आहे.

१० हजार ५०० एमसीएफटी क्षमतेच्या माणिकडोह धरणात ३ हजार ०७५ एमसीएफटी (३० टक्के) पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात ४३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडज धरणातून ५४३ एमसीएफटी (४६ टक्के) इतके पाणी आले आहे.

घोड नदीवरील डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. धरणात ७ हजार ४९६ एमसीएफटी (६० टक्के) इतके पाणी आले आहे. पुष्पावती नदीवरील पिंपळगाव जोगे धरणात २२५ एमसीएफटी (६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात ४४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

---

घोड धरण २४ टक्क्यांवर...

घोड धरणात १ हजार १५ एमसीएफटी (२४ टक्के) पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात २५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डिंभे धरण भरले की, घोड धरण भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विसापूर तलावात ९ टक्के, सीना धरणात २९ टक्के, खैरी १० टक्के इतके पाणी आहे. ही धरणे परतीच्या पावसानंतर भरण्याची शक्यता आहे.

----

भीमेला पूर.. घोड पात्र रिकामे...

पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र, कुकडीच्या खोऱ्यात पाऊस कमी आहे. त्यामुळे घोड नदीचे पात्र ओस पडले होते.

------

२५ भीमा

पाणलोटात जोरदार पाऊस झाल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.