शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

७०५ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत. आपले गाव कारभारी निवडण्यासाठी १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची मतदान केंद्रावर प्रथमच व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी दीड हजार कर्मचारी, तर साडे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ९ ग्रामपंचायतीमधील काही जागा बिनविरोध झाल्याने व काही जागांवर अर्ज प्राप्त न झाल्याने तेथील जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. ७०५ ग्रामपंचायतीसाठी ५ हजार ७९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

--------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

सर्व मतदान केंद्र सॉनिटाईज करण्यात आली असून मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांची तपासणी होईल. कोरोनाबाधित असेल आणि त्याला मतदान करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी शेवटचा अर्धा तास राखीव असेल. लक्षणे नसलेल्यांना नियम पाळून मतदान करता येईल.

----

१८ जानेवारीला मतमोजणी

१८ जानेवारीला सर्व तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. मतदानानंतर चौथ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.

--------------

निवडणूक निर्णय अधिकारी

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. संबंधित तहसीलदारांनी संबंधित तालुक्यातील मतदान केंद्रावर लक्ष ठेवायचे आहे. कुठेही गडबड-गोंधळ होणार नाही. याची सर्व दक्षता घेण्यात आली आहे.

---

५२ संवेदनशील गावे

जिल्ह्यात ५२ गावे संवेदनशील म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. अशा गावांमध्ये मतदान होण्यापूर्वीच्या दोन दिवस आधी पोलिसांचे पथसंचलन पार पडले आहे. तसेच या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

- उर्मिला पाटील,

उपजिल्हाधिकारी (महसूल-ग्रामपंचायत)

------------

पोलीस बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. तब्बल साडे तीन हजार पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. त्यामध्ये १२५ अधिकारी आहेत, तर दोन हजार पोलीस आणि तेराशे होमगार्ड आहेत. संवेदनशील गावांमध्ये पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मतदान केंद्रावरही बंदोबस्त असेल.

---

सोबत आकडेवारी आहे.