केडगाव-नेप्ती रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:34+5:302021-07-13T04:06:34+5:30

केडगाव : केडगाव मधून नेप्तीकडे जाणाऱ्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या मार्गाचे मजबुतीकरण करण्याची मागणी नगरसेविका सुनीता ...

Plight of Kedgaon-Nepti road | केडगाव-नेप्ती रस्त्याची दुर्दशा

केडगाव-नेप्ती रस्त्याची दुर्दशा

केडगाव : केडगाव मधून नेप्तीकडे जाणाऱ्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या मार्गाचे मजबुतीकरण करण्याची मागणी नगरसेविका सुनीता कोतकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

कोतकर यांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. केडगाव-नेप्ती मार्गालगत अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. तसेच नेप्ती उपबाजाराकडे जाणारी सर्व अवजड वाहने याच मार्गाचा वापर करतात. आदर्शगाव हिवरेबाजार, दैठणे गुंजाळ, निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा या गावांकडे जाणारी सर्व वाहने याच मार्गावरून जातात. यामुळे या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात वाहन चालविताना कसरत करावी लागते. या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करून ती नगर-पुणे मार्गावरून वळवावी, अशी मागणी कोतकर यांनी केली आहे.

यापूर्वी अनेकदा या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका सुनीता कोतकर, संग्राम कोतकर, युवराज कोतकर, बबलू कोतकर, दत्ता कोतकर, प्रवीण उगलमुगले, गौरव कार्ले, मंगेश मोटे आदींनी केली आहे.

----

फोटो पॅलेटमध्ये

केडगाव-नेप्ती रस्ता दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना केडगाव येथील कार्यकर्ते.

Web Title: Plight of Kedgaon-Nepti road