शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याच्यादृष्टीने नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील प्रभागांमध्ये करण्यात आलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार विखे यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ...

नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील प्रभागांमध्ये करण्यात आलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार विखे यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, रवींद्र गोंदकर, सचिन शिंदे, दत्तात्रय कोते, नितीन कोते, मंगेश त्रिभुवन, सचिन शिंदे, पोपटराव शिंदे, रवींद्र कोते, अशोक गोंदकर, ताराचंद कोते, अरविंद कोते, हिरामन वारुळे, अर्चनाताई कोते, वंदना गोंदकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे उपस्थित होते.

शहरातील प्रभागांमध्ये नगरपंचायतीने चिल्ड्रन पार्क, ओपन जिम, रस्ते, तसेच पेव्हिंग ब्लॉक आदी कामे केली आहेत. लक्ष्मीनगर येथे चर्मकार समाजातील युवकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून मंजूर केलेल्या व्यावसायिक शेडचे वितरण करण्यात आले. विविध चौकांच्या सुशोभिकरणाचा भूमिपूजन समारंभही विखे यांच्याहस्ते करण्यात आला.

कोविडमुळे शहराचे अर्थकारण थांबले आहे. कर सवलतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु याबाबत निर्णय होत नाही. ज्यांचे सरकार आहे, ते इथेच आंदोलन करतात. परंतु नगरपंचायतीने आपल्या अधिकारात काही निर्णय करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे विखे यांनी सूचित केले.

....................

कोविड संकटामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांपुढे बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत बँकांच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्यात येणार आहे.

- राधाकृष्ण विखे, आमदार

......................

पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच शहर सौंदर्यीकरण, मनोरंजनाच्या सुविधा यावर भर देण्यात येत आहे. पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांची साथ मिळत आहे.

- शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष