इंदिरा गांधी यांच्यामुळेच भारतात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:11+5:302021-09-24T04:25:11+5:30

डावर म्हणाले, भारताच्या दोन सीमांवर पूर्वी पाकिस्तान होते. जर बांगलादेशची निर्मिती झाली नसती तर पूर्वेकडूनही पाकिस्तानने भारताला छळले असते. ...

Peace in India only because of Indira Gandhi | इंदिरा गांधी यांच्यामुळेच भारतात शांतता

इंदिरा गांधी यांच्यामुळेच भारतात शांतता

डावर म्हणाले, भारताच्या दोन सीमांवर पूर्वी पाकिस्तान होते. जर बांगलादेशची निर्मिती झाली नसती तर पूर्वेकडूनही पाकिस्तानने भारताला छळले असते. मात्र, इंदिरा गांधी यांनी आपल्या प्रभावी आणि कणखर नेतृत्वाच्या माध्यमातून बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळे केले. त्यामुळे पूर्व पाकिस्तानकडून होणारा धोका संपला. म्हणूनच देशात शांतता पाहायला मिळत आहे.

माजी सैनिक मुदस्सर शेख, निवृत्त कॅप्टन निमसे यांचा कॅ. प्रवीण डावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मनोज गुंदेचा यांनी केले. सूत्रसंचालन खलील सय्यद यांनी केले. शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ. बापू चंदनशिवे यांनी आभार मानले.

युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष सागर ईरमल, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने, युवक काँग्रेसचे गणेश भोसले, शहर सोशल मीडिया अध्यक्ष सौरभ रणदिवे, प्रमोद अबुज, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, माजी नगरसेविका जरिना पठाण, प्रदेश सेवादलाच्या माजी पदाधिकारी शारदाताई वाघमारे, राणीताई पंडित, हेमलता घाटगे, राणीताई गायकवाड, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा खजिनदार मोहन वाखुरे, इम्रान बागवान, अजय मिसाळ, निसार बागवान, शरीफ सय्यद आदी उपस्थित होते. शकीला शेख यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

Web Title: Peace in India only because of Indira Gandhi