५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST2021-02-23T04:32:42+5:302021-02-23T04:32:42+5:30

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून आम्ही सर्व कर्मचारी विविध विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत आहोत. ३ ...

Pay salaries to 598 contract employees on time | ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करा

५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करा

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून आम्ही सर्व कर्मचारी विविध विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत आहोत. ३ जानेवारी २०२० रोजी नव्याने आम्हाला कायम कंत्राटी कर्मचारी या पदावर कायम करण्यात आले. पण गेल्या काही महिन्यात आमचे वेतन हे अवेळी अथवा लांबणीवर होत आहे. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आम्ही सर्व सामान्य कर्मचारी असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आहे. मुलांचे शिक्षण, घरातील आजारी व्यक्तीचे उपचार तसेच घऱगुती खर्च याचे आर्थिक बजेट पगार वेळेत होत नसल्याने बिघडते. यामुळे कुटुंबात कलह निर्माण होत आहे. तरी संस्थानने सहानुभूतीपूर्वक निर्णय़ घेऊन कायम व कंत्राटी कर्मचारी सोबतच ५९८ कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत करावे असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर अविनाश जगताप, रोहिदास चौधऱी, गणेश झांबरे, दीपक देसाई, अविनाश जगताप, जालिंदर गायके, नजीर शेख, राम माने, अंबर कणसे, गोकुळ यादव, रमेश जोशी, सुनील मांजरेकर, आप्पासाहेब तुरकणे यांच्यासह पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Pay salaries to 598 contract employees on time