पारनेमध्ये कुटुंब केली दूर, वस्त्यांमध्ये केली तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:13+5:302021-02-23T04:33:13+5:30

पारनेर : पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडला असून ६५० हरकती आल्या आहेत. अनेक कुटुंबातील ...

In Parne the family did away, the neighborhood did the demolition | पारनेमध्ये कुटुंब केली दूर, वस्त्यांमध्ये केली तोडफोड

पारनेमध्ये कुटुंब केली दूर, वस्त्यांमध्ये केली तोडफोड

पारनेर : पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडला असून ६५० हरकती आल्या आहेत. अनेक कुटुंबातील सदस्यांची दोन-दोन नवे वेगवेगळ्या प्रभागात टाकून कुटुंब दूर केली आणि वाड्या-वस्त्यांमध्ये तोडफोड करून नावाची विभागणी केली आहे.

पारनेर नगरपंचायतीची मुदत संपल्यावर प्रभाग रचना, आरक्षण सोडत होऊन १५ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गडबडी झाल्याचे मतदार यादी पाहिल्यावर दिसून आले. पारनेरमध्ये सतरा प्रभाग आहेत. अनेक प्रभागांतील अनेकांची नावे मूळ प्रभाग सोडून वेगवेगळ्या प्रभागात गेल्यावर मोठा गोंधळ उडाला. ६५० तक्रारी मतदार व इच्छुक उमेदवार यांनी घेतल्या आहेत.

नगरपंचायतीच्या काही कर्मचाऱ्यांना प्रभागाची माहिती असूनही अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या प्रभागात मतदार झाले आहेत. अशा प्रकारच्या सर्वाधिक हरकती नगरपंचायतीकडे प्राप्त झाले आहेत. यासह बाहेरील मतदार समाविष्ट करण्यात आल्याच्या तक्रारी जास्त आहेत.

----

हरकती जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. हरकती यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे.

-डॉ. सुनीता कुमावत,

मुख्याधिकारी, नगरपंचायत, पारनेर

Web Title: In Parne the family did away, the neighborhood did the demolition