कोपरगावच्या २८ जणांची सायकलवर पंढरपूर वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:30+5:302021-07-30T04:22:30+5:30

कोपरगाव : तालुक्यातील कोपरगाव सायकलिंग ग्रुपचे २८ सदस्य निरोगी आरोग्य आणि प्रदूषणमुक्त परिसराचा संदेश देत गुरुवारी ( दि. २९ ...

Pandharpur Wari on the bicycle of 28 people from Kopargaon | कोपरगावच्या २८ जणांची सायकलवर पंढरपूर वारी

कोपरगावच्या २८ जणांची सायकलवर पंढरपूर वारी

कोपरगाव : तालुक्यातील कोपरगाव सायकलिंग ग्रुपचे २८ सदस्य निरोगी आरोग्य आणि प्रदूषणमुक्त परिसराचा संदेश देत गुरुवारी ( दि. २९ ) सायकलवर शहरातील साईबाबा तपोभूमी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. या सायकल दिंडीला तहसीलदार योगेश चंद्रे यांनी झेंडा दाखविला. तर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांनी आशीर्वाद दिले.

कोपरगाव सायकलिंग ग्रुपचे पंढरपूर वारीचे हे पहिलेच वर्ष असून या सायकल वारीत २८ जणांनी सहभाग नोंदविला. या सायकल दिंडीत कोपरगाव तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, भाजप नेते पराग संधान, विजय आढाव, केशवराव होन, प्रसाद नाईक, संदीप देवकर, दिनेश कोल्हे, बापूसाहेब सुराळकर, उमेश लोंढे, बाळासाहेब निकोले, मनोज आहेर, अनिल मुसमाडे, उमेश गोसावी, भास्कर सुराळकर, कैलास शेळके, प्रसाद निकुंभ, प्रशांत शहाणे, संतोष नेरे, संतोष पवार, नितीन त्रिभुवन, शरद कदम, दीपक सुपेकर, कैलास बहिरट, राजेंद्र निकम, प्रशांत सुराळकर, राजेंद्र सालके, संदीप शिरोडे यांचा सहभाग आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, ज्येष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे, नगरसेवक रवींद्र पाठक, माजी सभापती सुनील देवकर, बाळासाहेब आढाव, सरपंच भीमा संवत्सरकर, महेंद्र अमृतकर, धनंजय सावजी, डॉ. रवींद्र मगर, बाळू सारंगधर उपस्थित होते.

..............

२९- सायकलवारी - कोपरगाव

Web Title: Pandharpur Wari on the bicycle of 28 people from Kopargaon