भेंड्यात गोळीबार एकजण जखमी ; मैदानावर क्रिकेट खेळणा-याच्या छातीत घुसली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 11:25 IST2021-05-03T11:24:19+5:302021-05-03T11:25:54+5:30

भेंडा  (जि. अहमदनगर) : रविवारी रात्री भेंडा येथे पूर्वीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१ वर्षे,  रा. भेंडा, ता.नेवासा ) हा युवक जखमी झाला असून त्याचेवर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

One injured in shooting at sheep; Injured playing cricket on the field | भेंड्यात गोळीबार एकजण जखमी ; मैदानावर क्रिकेट खेळणा-याच्या छातीत घुसली गोळी

भेंड्यात गोळीबार एकजण जखमी ; मैदानावर क्रिकेट खेळणा-याच्या छातीत घुसली गोळी

भेंडा  (जि. अहमदनगर) : रविवारी रात्री भेंडा येथे पूर्वीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१ वर्षे,  रा. भेंडा, ता.नेवासा ) हा युवक जखमी झाला असून त्याचेवर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भेंडा येथील सोमनाथ तांबे आपल्या  मित्रांसोबत रविवार दि.२ मे रोजी रात्री भेंडा येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत असताना रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने खेळत असलेल्या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात चुकून गोळी लागल्याने सोमनाथ गंभीर जखमी  झाला. गोळी त्याचे छातीत मधोमध लागल्याने तो थोडक्यात बचावला. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

दरम्यान हल्लेखोरांचा इतर दुसऱ्या कोणाला तरी लक्ष करावयाचे होते परंतु खेळता खेळता सोमनाथमध्ये आल्याने त्याला गोळी लागली असे सांगितले जाते. दरम्यान नेवासा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी पोलिस निरीक्षक विजय करे यांचेशी संपर्क साधला असता जखमी सोमनाथ तांबे यांचे जबाब व फिर्यादी वरून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: One injured in shooting at sheep; Injured playing cricket on the field