सार्इंना सुवर्ण ताट अर्पण

By Admin | Updated: August 2, 2024 16:59 IST2014-09-07T23:45:22+5:302024-08-02T16:59:45+5:30

शिर्डी : दिल्लीतील एका महिला भाविकाने साईबाबांना सोन्याचे ताम्हण (ताट) अर्पण केले़

Offering a gold plate of saree | सार्इंना सुवर्ण ताट अर्पण

सार्इंना सुवर्ण ताट अर्पण

शिर्डी : दिल्लीतील एका महिला भाविकाने साईबाबांना सोन्याचे ताम्हण (ताट) अर्पण केले़ या ताम्हणाची किंमत दहा लाख पासष्ट हजार रूपये आहे़
मदान असे या महिला भाविकाचे नाव असून शनिवारी सायंकाळी त्यांनी हे ताम्हण साईसमाधीवर अर्पण केले़ यावेळी संस्थानचे मंदिर प्रमुख रामराव शेळके उपस्थित होते़
अठरा कॅरेट सोने असलेल्या या ताम्हणाचे वजन पाचशे अकरा गॅ्रम असून त्याची किंमत दहा लाख पासष्ट हजार रूपये आहे़ साईबाबांच्या पुण्यतिथीला करण्यात येणाऱ्या आराधना विधीसाठी, तसेच दीपावलीत लक्ष्मीपूजनासाठी हे ताम्हण पूजेसाठी वापरण्यात येणार असल्याचे मंदिर विभागाकडून सांगण्यात आले़ या देणगीदार महिलेचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Offering a gold plate of saree