नगरची रुग्णसंख्या चार हजाराच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:29+5:302021-07-24T04:14:29+5:30
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८१ हजार ८१३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ...

नगरची रुग्णसंख्या चार हजाराच्या पुढे
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८१ हजार ८१३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ९६.५१ टक्के आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १९४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७१ आणि अँटिजन चाचणीत ३१९ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १३, अकोले ४, जामखेड १, नगर ग्रामीण १९, नेवासा १, पारनेर १८, पाथर्डी ८५, राहता १, राहुरी १, संगमनेर ६, श्रीगोंदा ३९ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ११, अकोले ११, जामखेड २, कर्जत २१, कोपरगाव १७, नगर ग्रा. २०, नेवासा २१, पारनेर १५, पाथर्डी ४, राहता २१, राहुरी ४, संगमनेर ६६, शेवगाव ३१, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १०, कॅन्टोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत मनपा ८, अकोले ४५, जामखेड १८, कर्जत ३२, कोपरगाव १५, नगर ग्रा. १९, नेवासा २१, पारनेर ६२, पाथर्डी ८, राहता १२, राहुरी १९, संगमनेर २३, शेवगाव ५, श्रीगोंदा ३० आणि श्रीरामपूर २ असे रुग्ण बाधित आढळले.
----------
बरे झालेली रुग्ण संख्या : २,८१,८१३
उपचार सुरू असलेले रुग्ण : ४,०८९
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६,१०१
एकूण रुग्ण संख्या : २,९२,००३