संगमनेर, शेवगाव तालुक्यात रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:55+5:302021-07-30T04:22:55+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ९२० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे संगमनेर आणि शेवगाव तालुक्यातील ...

संगमनेर, शेवगाव तालुक्यात रुग्ण वाढले
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ९२० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे संगमनेर आणि शेवगाव तालुक्यातील आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही साडेपाच हजारापर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ७८६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८५ हजार ५३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३७३ आणि अँटिजन चाचणीत ४२० रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (१२५), शेवगाव (११९), श्रीगोंदा (९१), पारनेर (७७), राहुरी (६९), जामखेड (६८), नगर ग्रामीण (६६), राहाता (६२), कर्जत (५४), कोपरगाव (४०), इतर जिल्हा (३०), श्रीरामपूर (२७), अकोले (२६), पाथर्डी (२६), नेवासा (२३), नगर शहर (१७), इतर जिल्हा (०) येथील रुग्णांचा समावेश आहे.
----------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : २,८५,५३४
उपचार सुरू असलेले रूग्ण : ५५५३
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६१५५
एकूण रूग्ण संख्या : २,९७,२४२