अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच रुग्णांची संख्या एक हजारांच्यावर गेली आहे. रविवारी जिल्ह्यात १०२६ कोरोना बाधितांची नोंद झाली. पारनेरमध्ये २१० तर जामखेडमध्ये १८० रुग्ण आढळून आले. ही संख्या दैनंदिन सरासरीच्या दुपटीने संख्या वाढली आहे. नगर शहरात २३ रुग्ण आढळले आहेत. रुग्ण वाढल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सरासरी चारशे ते पाचशे दैनंदिन रुग्ण असायचे. गत आठवड्यात ही संख्या सातशे ते आठशेपर्यंत गेली होती. ही संख्या लाट ओसरल्यानंतर प्रथमच एक हजारांच्यावर गेली आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २४६, आरटीपीसीआर चाचणीत ३९८, रॅपिड अँटिजन चाचणीत ३८२ रुग्ण आढळले. त्यामध्ये पारनेर (२१०), जामखेड (१८०), शेवगाव (९७), कर्जत (७४),संगमनेर (७०), नगर ग्रामीण (६६), नेवासा (५९), पाथर्डी (५९),अकोले (५२), राहुरी (४३), राहाता (२६), नगर शहर (२३), कोपरगाव (१९), श्रीरामपूर (१९), श्रीगोंदा (१७), इतर जिल्हा (१२), भिंगार (०) येथील रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी ७५२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ८३ हजार ९४६ इतकी आहे. बरे होण्याचे हे प्रमाण ९६.३९ टक्के इतके आहे. रुग्णसंख्या वाढल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ४४६ इतकी झाली आहे.
-----------
कोरोना स्थिती
एकूण रुग्ण-२, ९३, ७५८
बरे झालेले-२,८३,९४६
उपचार सुरू-४४९६
मृत्यू-६११६