शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

के के रेंजच्या फायरिंगसाठी जमीन देणार नाही : पालकमंत्र्यांनी थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 13:54 IST

नगर, राहुरी, पारनेर तालुक्यातील शासकीय जमिन लष्कराकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यामुळे या तीनही तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित होतील, असा आरोप करीत या हस्तांतरणाला तिनही तालुक्यात विरोध आहे. आता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हेही शेतक-यांच्या बाजुने मैदानात उतरले असून, सरकारदरबारी या जमिन हस्तांतरणाला विरोध करणार असल्याचे राम शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

अहमदनगर : नगर तालुक्यातील लष्काराचे सराव क्षेत्र असलेल्या के के रेंजच्या विस्तारणीकरणासाठी नगर, राहुरी, पारनेर तालुक्यातील शासकीय जमिन लष्कराकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यामुळे या तीनही तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित होतील, असा आरोप करीत या हस्तांतरणाला तिनही तालुक्यात विरोध आहे. आता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हेही शेतक-यांच्या बाजुने मैदानात उतरले असून, सरकारदरबारी या जमिन हस्तांतरणाला विरोध करणार असल्याचे राम शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.नागपूरमधील कोराडी आणि अन्सारी येथील लष्कर क्षेत्रातील जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार असून, त्याबदल्यात लष्कराच्या अहमदनगर येथील फायरिंग रेंजसाठी सरकारी जमीन दिली जाणार आहे. याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह महसूल विभाग, पर्यटन विभाग, तसेच लष्कराच्या अधिका-यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. नगरच्या फायरिंग रेंजसाठी पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्यांतील सरकारी जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री राम शिंदे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, राहुरी-नगर मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले व मी शेतक-यांची जमिन लष्कारासाठी देण्यात येऊ नये, लष्कारासाठी वाढीव जमिन हस्तांतरीत केली जाऊ नये, यासाठी मंत्रालयात योग्य वेळी विरोध नोंदविणार आहोत़ तसेच याबाबत वरिष्ठांशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील जमिन हस्तांतरण आपण होऊ देणार नाही, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या भरतीची चौकशी पारदर्शी होणार

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीबाबत सर्व स्तरातून मोठा आक्षेप घेतला जात असून, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे़ जिल्हा नोकर भरतीतील अनागोंदी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली़ त्यानंतर या भरतीला स्थगिती मिळाली़ आता या भरती प्रकरणाची चौकशी सुरु आहे़ याबाबत पालकमंत्री राम शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या भरतीची चौकशी पारदर्शी होणार आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Armyभारतीय जवानRam Shindeराम शिंदे