शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससीत नगरकरांचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST

विनायक कारभारी नरवडे हा नगर येथील सावेडीतील असून, त्याचे प्राथमिक शिक्षण आठरे पाटील स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा महाविद्यालयात ...

विनायक कारभारी नरवडे हा नगर येथील सावेडीतील असून, त्याचे प्राथमिक शिक्षण आठरे पाटील स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा महाविद्यालयात पूर्ण झाले. पुढे पुणे येथून अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण घेऊन त्याने अमेरिकेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली व काही काळ नोकरीही केली. परंतु आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे अभ्यासासाठी नोकरीवर पाणी सोडून तो पुन्हा मायदेशी परतला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र यंदाच्या परीक्षेत त्याने अखेर यशाला गवसणी घातली. विनायकने देशात ३७ वी रँक पटकावली असून, राज्यात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. विनायकचे वडील व बहीण डाॅक्टर असून, आई गृहिणी आहे. आपण केलेल्या कष्टाचे हे चीज असून, कुटुंबीयांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे विनायकने सांगितले.

अभिषेक दिलीप दुधाळ याने युपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. अभिषेक हा बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील असून, त्याला ४६९ वी रँक मिळाली आहे. अभिषेकचे वडील दिलीप दुधाळ हे शिक्षक, तर आई संगीता गृहिणी आहेत.

विकास बाळासाहेब पालवे हा मूळ सोनई (ता. नेवासा) येथील असून, त्याने ५८७ वी रँक मिळवली. गेल्या चार वर्षांपासून तो युपीएससीची तयारी करीत होता. त्याचे वडील बाळासाहेब पालवे हे शिक्षक, तर आई शोभा या गृहिणी आहेत.

------------------

सूरजचे पहिल्याच प्रयत्नात यश

सूरज गुंजाळ याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याचे प्राथमिक शिक्षण नवनागापूर येथील गजानन कॉलनीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा कॉलेज येथे झाले. पुढे पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. मागील दोन वर्षांपासून तो केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील नगर एमआयडीसीतील एका कंपनीत कर्मचारी आहेत, तर आई गृहिणी आहे.

-----

शिक्षकाच्या मुलाचे यश

शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील सुहास गाडे याने प्राथमिक शिक्षण चापडगाव येथून, माध्यमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातून, तर नांदेड येथून कॉम्प्युटर सायन्सची पदवी मिळविली. त्याचे वडील आबासाहेब काकडे विद्यालयात शिक्षक असून, आई गृहिणी आहे. सूरजने पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळविले.

---------

फोटो - २४विनायक नरवडे, सूरज गुंजाळ, सुहास गाडे, अभिषेक दुधाळ, विकास पालवे