शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ऊठ-सूठ झोपेतही ‘त्यांना’ माझे सोयरे दिसतात!

By admin | Updated: June 1, 2014 00:21 IST

अहमदनगर : शिवसेनेत लोकशाही आहे, सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे.

अहमदनगर : शिवसेनेत लोकशाही आहे, सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मला ही तो आहे. यामुळे मी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून नाही तर नगर शहर मतदारसंघातूनच सेनेकडून लढणार आहे. ऊठ-सूठ झोपेतही ‘त्यांना’ माझे सोयरे दिसतात, पण सोयर्‍यांविरुद्ध सेनेकडून मी केलेला संघर्ष दिसला नाही का?’’ असा टोला सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी आ. अनिल राठोड यांना मारला. दक्षिण शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख सुहास सामंत, खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, राजेंद्र दळवी, प्रा.मधुकर राळेभात, महिला संघटक प्रमुख सुजाता कदम आदी यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीत सर्व तालुका प्रमुखांनी लोकसभा निवडणूक व मतदानाचा आढावा जाहीर करून सेनेकडून प्रा.गाडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. यावेळी प्रा. गाडे म्हणाले की, जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवल्याने दोन्ही जागा युतीच्या निवडून आल्या. आता विधानसभा निवडणुकीतही असेच एकदिलाने काम केले तर जिल्ह्यातील १२ च्या १२ आमदार युतीचे निवडून येतील. शिवसैनिकांच्या आग्रहाखातर यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीगोंदा मतदारसंघ भाजपाकडे असल्याने मी नगर शहरातून शिवसेनेची उमेदवारी करणार आहे. पक्षश्रेष्ठींकडे मी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. जनता विकास कामांना पाठबळ देणारी असल्याने आता भावनिक मुद्यांची दुकानदारी मतदारांमध्ये चालणार नाही. प्रा. गाडे पुढे म्हणाले की, आ.अनिल राठोड यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवरून बदनामी प्रकरणी नेमका माझ्याच मुलावर गुन्हा दाखल कसा झाला. तो परदेशात होता. तो नगरमध्ये येण्याआधीच बदनामीचा मॅसेज शहरात आठवडाभर फिरत होता. कुरघोडी म्हणूनच हा गुन्हा दाखल केला. मात्र व्हॉटस्अ‍ॅपवर जो मजकूर होता त्याची चर्चा तर महिनाभर आधी लोक करत होते ते फक्त व्हॉटस्अ‍ॅपवर आले. ज्यांनी हा मेसेज तयार केला सर्वात आधी पाठवला त्याचा शोध घ्या. आ.शिवाजी कर्डिले, आ.अरुण जगताप, भानुदास कोतकर हे माझे सोयरे आहेत. पण राजकारण आणि नाते संबंध याचे तारतम्य मी पाळतो. राजकारणात त्याचा संबंध येऊ देत नाही. कोतकरांच्या विरोधात लढलो, कर्डिलेंच्या विरोधात लढलो, जगतापांना महापौरपदाच्या निवडणुकीत शह देऊन शीला शिंदे यांना महापौर करण्यात पुढाकार घेतला. सेनेने माझ्यावर जबाबदारी दिली ती पूर्ण करताना सोयर्‍याधायर्‍यांचा विचार केला नाही, करणार नाही. तरीपण आ.राठोड यांना झोपेतही माझे सोयरेच कसे दिसतात? असा टोला प्रा.गाडे यांनी मारला. खा.दिलीप गांधी व खा. सदाशिव लोखंडे यांचा शिवसेनेतर्फे सत्कार ठेवला म्हणून आ. राठोड यांना वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. ते युतीचे खासदार आहेत.(प्रतिनिधी)शिवसेनेने गेल्या तीन-चार वर्षात कुणामुळे काय घडलयं काय बिघडलय, कुणी ते बिघडवलंय याचा अहवाल तयार केला आहे. तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. नगर शहरातून गाडे की राठोड याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. जो कोणी उमेदवार असेल त्यांना निवडून आणू. -सुहास सामंत जिल्हा संपर्क प्रमुखसेनेच्या बैठकीत राठोडांवर आगपाखड जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत जिल्हा प्रमुख प्रा.गाडे यांनी आ.राठोड यांच्यावर कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता जोरदार व आक्रमकपणे टिकेचा प्रहार केला. परस्पर माझ्याबद्दल प्रतिक्रिया देण्यापेक्षा पक्षाच्या व्यासपीठावर येऊन बोला मग मी सगळं सांगतो, असा सल्लाही त्यांनी दिला.