अहमदनगर: महापालिकेच्या जुन्या इमारतीतील सभागृहात सरगम प्रेमी मित्रमंडळाच्यावतीने नुकतीच संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभागृहाच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, सरगम प्रेमी संस्थेचे अध्यक्ष राम शिंदे, उपाध्यक्ष पवन नाईक, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, सिनेकलावंत मोहनीराज गटणे आदी उपस्थित होते.
यावेळी भाेसले म्हणाले की, सभागृहाने नाट्य, कला आणि इतिहास जोपासण्याचे काम केले. सभागृहाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरगम प्रेमी मित्रमंडळाने संगीत सभेचे आयोजन करत चांगला पायंडा पाडला आहे. सर्वांच्या सहकार्याने येत्या पंधरा दिवसात चांगला निर्णय घेऊ, असे अश्वासन यावेळी भोसले यांनी दिले.
यावेळी काव्य हिंगणे, किरण जोशी, जान्हवी खिस्ती, वर्षा पंडित, महेश खोपटीकर , सुधाकर शिंदे, पोपटराव धामणे, अमर एकडे, अमोल बागुल, पवन नाईक, अविनाश देऊळगावकर, नीलेश खळीकर, तुषार भंडारे, आकाश गाडेकर, ओमकार देऊळगावकर आदींनी कला सादर केली.
....
सूचना फोटो २५ एएमसी नावाने आहे.