शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महापालिकांतील अधिकाऱ्यांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यातील महापालिकांमधील अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या इतर महापालिकांमध्ये बदल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्यातील महापालिकांमधील अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या इतर महापालिकांमध्ये बदल्या करण्याबाबत अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

लोकमतमध्ये ‘महापालिकेतील अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही’ या मथळ्याखाली पाच भागांची वृत्त मालिका प्रकाशित करण्यात आली होती. या वृत्त मालिकेबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, महापालिकेतील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. नगर परिषदांमध्ये अशीच परिस्थती होती. मात्र, राज्यातील सर्व नगरपालिकांचा अभ्यास करून अधिकाऱ्यांचा राज्य संवर्ग तयार केला गेला. त्यानुसार नगर परिषदेतील शहर अभियंता, विद्युत अभियंता, पाणी पुरवठा अभियंता, नगररचना, स्वच्छता, लेखा व वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या एका विभागांतर्गत बदल्या करण्यास सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत विचार होण्याची गरज आहे. यावर सविस्तर अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय राज्यातील सर्व महानगरपालिकांतील अधिकाऱ्यांसाठी लागू करण्यात येईल, असे तनपुरे म्हणाले.

महापालिकेतील नगररचना, पाणी पुरवठा, बांधकाम हे विभाग महत्त्वाचे आहे. कोणत्याही शहराचं शहरपण टिकवून ठेवण्यासाठी नगररचना विभागाचे महत्त्व आहे. नगररचना विभागात वर्षानुवर्षे तेच ते अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत, हे योग्य नाही. या सर्व बाबींचा अभ्यास करून निश्चितपणे निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेण्याच्या मानसिकतेत सरकार आहे.

....

पहिल्या टप्प्यात २० टक्के लिपिकांच्या बदल्या - आयुक्त

महापालिकेतील लिपिकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी शंभर टक्के बदल्या करणे शक्य नाही. मात्र, टप्प्याने बदल्या करणे शक्य असून, पहिल्या टप्प्यात २० लिपिकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार कामाच्या सोयीनुसार बदल्या करण्यास सुरुवात करणार असल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी याविषयी बोलताना सांगितले.

आयुक्त गोरे म्हणाले की, महापालिकेत अधिकारी नाहीत. त्यामुळे प्रशासनाचाही नाईलाज आहे. दहा वर्षे एका विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणे शक्य नसते. कारण दुसरा अधिकारी लगेच मिळत नाही. इतर लिपिकांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या तरी ते काम करत नाहीत. त्यामुळे तेच ते कर्मचारी एका टेबलावर काम करताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. कामाच्या सोयीसाठी तसा निर्णय घ्यावा लागतो; परंतु कामाच्या सोयीनुसार लिपिकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या टप्प्याटप्प्याने करण्यात येतील, असे गोरे म्हणाले.

.....

राजकीय दबावामुळे बदल्यांना ब्रेक- लोखंडे

महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करण्याबाबत शासनाचा आदेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, अहमदनगर महानगरपालिकेत शासकीय आदेशाची अंमलबजावणी होत नाही. राजकीय दबावाला बळी पडायचे की आदेशाची अंमलबजावणी करायची, याबाबत प्रशासकीय यंत्रणेने परखड भूमिका घेण्याची गरज आहे; परंतु दुर्दैवाने ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम करण्याची संधी मिळत नाही. एकाच टेबलावर वर्षानुवर्षे कर्मचारी काम करत असल्याने इतरांना संधी मिळत नाही. परिणामी नवीन कल्पना राबविल्या जात नाहीत. महापालिका पूर्णपणे बिगारी कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देण्याची संघटनेची मागणी आहे. तातडीने निवड समितीची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे, असे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

...............

आकृतिबंधाकडे कानाडोळा- चंगेडे

महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. महापालिकेचा आकृतिबंध तयार केल्यास असे प्रकार घडणार नाहीत; परंतु जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा केला जात असून, संपूर्ण शहरासाठी दोनच अभियंते कसे, असा प्रश्न कुणालाच कसा पडत नाही. महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे का, याची तपासणी कोण करणार, हाही प्रश्न आहे. शैक्षणिक पात्रता नसलेल्यांना पदे वाटण्यात आलेली आहेत. हेच अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली असून, याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सांगितले.