सुजय विखे यांनी विमानाने आणला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 00:18 IST2021-04-25T00:17:50+5:302021-04-25T00:18:16+5:30

विखे म्हणाले की, ‘आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली.

MP Sujay Vikhe brought stock of Remedesivir injection by plane | सुजय विखे यांनी विमानाने आणला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा

सुजय विखे यांनी विमानाने आणला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा

अहमदनगर : भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला आहे. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. राजकारण अथवा श्रेयासाठी नव्हे तर, गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. मात्र, सरकार कारवाई करेल म्हणून गोपनीयता बाळगली, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. 
विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिली. 

विखे म्हणाले की, ‘आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही मदत घेतली. हे करत असताना गरिबांसाठी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर करत आहे.’ विखे यांनी गत सोमवारी विमानाने हा साठा आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा उतरविला. तो कोठून आणला व किती इंजेक्शन आणली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

Web Title: MP Sujay Vikhe brought stock of Remedesivir injection by plane