रुग्णसेवेसाठी दिली जाणारी मदत लाखमोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:21+5:302021-08-27T04:24:21+5:30

शेवगावमधील नेवासा रोडवरील डॉ. बडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने कोरोना काळात रुग्णांची अविरत सेवा करीत हजारो रुग्णांना दिलासा दिला. त्यांच्या या ...

Millions of rupees for patient care | रुग्णसेवेसाठी दिली जाणारी मदत लाखमोलाची

रुग्णसेवेसाठी दिली जाणारी मदत लाखमोलाची

शेवगावमधील नेवासा रोडवरील डॉ. बडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने कोरोना काळात रुग्णांची अविरत सेवा करीत हजारो रुग्णांना दिलासा दिला. त्यांच्या या सेवाकार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान (संगमनेर) व ढाकणे शैक्षणिक संकुल (राक्षी, शेवगाव) यांच्या वतीने अद्ययावत रुग्णवाहिकेची भेट देण्यात आली. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी डोके बोलत होते. कार्यक्रमास माजी सभापती अरुण लांडे, ढाकणे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सचिव जयाताई ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, डॉ. सोमनाथ बडे, डॉ. शुभांगी बडे, डॉ. प्राचार्य बी. आर. अत्तार, ॲड. सानप, ग्रामसेवक युनियनचे अशोक नरसाळे, रामदास बडे, बबनराव बडे, संजय घुगे, शिवाजी फुंदे, त्र्यंबके भाऊसाहेब, शिवाजी महाराज देशमुख, नफीसखान पठाण आदी उपस्थित होते.

एकनाथ ढाकणे म्हणाले, कोरोना महामारीने वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले. अज्ञात अशा विषाणूशी सामना करताना डॉक्टर मंडळींनी स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. डॉ. सोमनाथ बडे यांनी आभार मानले.

-------------

फोटो - २६ ॲम्ब्युलन्स भेट

केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान (संगमनेर) व ढाकणे शैक्षणिक संकुल (राक्षी, शेवगाव) यांच्या वतीने बडे हाॅस्पिटलला रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

Web Title: Millions of rupees for patient care