शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

हजारेंच्या उमेदवारीवर सोशल मीडियात मंथन

By admin | Updated: July 11, 2024 18:08 IST

पारनेर : अण्णांनी उमेदवारी केली तर हरकत काय? यासह अन्य प्रश्नांवर पारनेर तालुका विकास मंचच्या साईटवर युवकांनी विचारमंथन सुरु केले आहे.

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पारनेर मतदारसंघातून बिनविरोध निवडून दिले पाहिजे. अण्णांनी उमेदवारी केली तर हरकत काय? यासह अन्य प्रश्नांवर पारनेर तालुका विकास मंचच्या साईटवर युवकांनी विचारमंथन सुरु केले आहे.देशाला माहितीचा अधिकार,जनलोकपाल कायदे यासह राज्यात सात कायदे मिळवून देणारे पारनेर तालुक्याचे सुपुत्र अण्णा हजारे यांनाच विधानसभेच्या आखाड्यात उतरवून सोशल मीडियात नवी चर्चा उडवून दिली आहे. पण यानिमित्ताने युवक हिरिरीने मत नोंदवत असल्याचे समोर आले आहे. विकास मंचचे प्रमुख गणेश कावरे, गौरव भालेकर यांनी विविध मुद्दे चर्चेत येतील, अशी आखणी केली आहे. उद्योजक दशरथ बोरूडे यांनी अण्णा हजारे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या माणसाला बिनविरोध निवडून देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तर वकील जगदीप शिंदे, गणेश कावरे यांनी तर पूर्णवेळ प्रचारात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. अण्णांनी देशातील सामान्य माणसांना अनेक कायदे मिळवून दिले, मग पारनेर मतदारसंघ देशात मॉडेल बनविण्यासाठी व पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अण्णा हजारेंनाच उमेदवारी पाहिजे, असे मत सतीश भालेकर, गजानन अंबुले, विशाल शिंदे यांनी मांडले आहे. तर के. ई. एम. हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब बांडे यांनी अण्णा हे राजकीय व्यक्ती नाहीत तर सामाजिक मार्गदर्शक असल्याचे म्हटले आहे. आपण अण्णांना उमेदवारीचे साकडे घालू, असे गौरव भालेकर,अभय गट व इतरांनी मत मांडले आहे. विजय वाघमारे यांनी याबाबत निष्फळ चर्चा नको असे म्हटले तर संजय वाघमारे यांनी अण्णा हे इतरांच्या तुलनेत खूप मोठे आहेत. अण्णांचे स्वीय सहाय्यक दत्ता आवारी यांनी चर्चेत भाग घेताना अण्णा या विषयावर राजी होणार नाहीत, त्यांनी यापूर्वीच राजकीय पक्ष स्थापन करण्याला विरोध केला असून केजरीवाल यांच्या कंपूत ते गेले नाही, याकडे लक्ष वेधले आहे. त्यांचे कर्र्तृत्व खूप मोठे आहे त्यांना मतदारसंघापुरते संकुचित करू नका, असे मत डॉ. नरेंद्र मुळे, नजीर तांबोळी, उदय शेरकर यांनी मांडले आहे.(तालुका प्रतिनिधी)