नागवडे कारखान्यात धुडगूस घालणाऱ्यांना सभासदांनीच रोखायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:02+5:302021-09-21T04:23:02+5:30

श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे त्यांच्या अपार कष्ट, परिश्रम, त्यागातून ‘नागवडे ’ कारखाना गेली ...

Members should stop those who put dust in Nagwade factory | नागवडे कारखान्यात धुडगूस घालणाऱ्यांना सभासदांनीच रोखायला हवे

नागवडे कारखान्यात धुडगूस घालणाऱ्यांना सभासदांनीच रोखायला हवे

श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे त्यांच्या अपार कष्ट, परिश्रम, त्यागातून ‘नागवडे ’ कारखाना गेली ५५ वर्षे येथील शेतकरी, कामगार व सामान्यांची कामधेनू म्हणून काम करीत आहे. बापूंचे नाव घेत कारखान्यात धुडगूस घालण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. अशा मंडळींना सभासदांनी मतपेटीतून रोखणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केले आहे.

राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रविवारी रक्तदान शिबिर झाले. श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वरवंड येथील सुभाषराव कुल महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंदराव निंबाळकर यांचे स्व. शिवाजी बापू यांच्या जीवन प्रवासावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी होते. यावेळी ते बोलत होते.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, स्व. बापूंची शिकवण व वारसा घेऊनच संचालक मंडळ कारभार करीत आहे. मात्र हे काहींच्या डोळ्यात खूपत असल्याने कुरघोडी व बदनामीचे राजकारण केले जात आहे. पारदर्शक कारभारावर आक्षेप घेऊन सभासदांची विनाकारण व दिशाभूल करणारे आरोप करणाऱ्या चौकडीला सभासदच त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी स्व. बापूंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, अरुणराव पाचपुते, प्रा. सुनील माने, ॲड. सुनील भोस, विजय कापसे, विलासराव काकडे, योगेश भोयटे, राकेश पाचपुते, विश्वनाथ गिरमकर, सचिन कदम, राजकुमार पाटील, शिवाजी जगताप, सुनील सूर्यवंशी, सरपंच उदयसिंह जंगले, चांगदेव पाचपुते, विठ्ठल जंगले, निळकंठ जंगले, माजी संचालक खासेराव घाडगे, आदेश नागवडे, दिनेश गायकवाड, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे उपस्थित होते. भाऊसाहेब बांदल यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव गिरमकर यांनी आभार मानले.

---

२० श्रीगोंदा नागवडे

श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील कार्यक्रमात बोलताना राजेंद्र नागवडे.

Web Title: Members should stop those who put dust in Nagwade factory