शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, नगरसेवकांची केवळ पर्यटनवारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी समर्थक नगरसेवकांसह मुंबईत अनेक मंत्र्यांची या आठवड्यात भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया ...

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी समर्थक नगरसेवकांसह मुंबईत अनेक मंत्र्यांची या आठवड्यात भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री अदिती तटकरे, के. सी. पाडवी व इतर मंत्र्यांना यावेळी शहरातील विकास कामांप्रश्नी निवेदने देण्यात आली. शहरातील रेल्वे भुयारी मार्ग, वाढीव पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामांचा यावेळी पाठपुरावा करण्यात आला. अपूर्ण व नवीन कामांना निधीची मागणी केली गेली.

मात्र असे असले तरी शहरातील अनेक मोठी कामे व योजना साडे चार वर्षांपासून रखडल्या आहेत. यातील काही कामांची तर उद्घाटनेही करण्यात आली. याशिवाय जवळपास पूर्णत्वास गेलेल्या काही कामांचे लोकार्पण होऊ शकलेले नाही. केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी यातील काही कामे अडकून पडलेली आहेत.

सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ २८ डिसेंबरला संपत आहे. प्रत्यक्ष निवडणुकांपूर्वी ४५ दिवस आधीच आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेत नवीन विकास कामांना ब्रेक लागतो. निधीची घोषणा, निविदा व उद्घाटने करता येत नाही. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांच्या सत्ताकाळात पालिकेत कोणतेही नवीन काम मार्गी लावणे शक्य नाही. किमान जुनी कामे तरी पूर्ण व्हावीत अशीच शहरवासीयांची भावना आहे. त्यामुळे नगराध्यक्षा आदिक व नगरसेवकांचा मुंबई दौरा निव्वळ फार्स ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

------

रखडलेली कामे त्यामागील कारण

भुयारी गटार योजना : शेती महामंडळाकडून भूसंपादन.

शहरात सॅटेलाईट मंडई : जागेची अडचण.

(खा. सुप्रिया सुळे यांनी केले होते भूमिपूजन)

मत्स्यालय : निधी उपलब्ध नाही.

खासदार आदिक नाट्यगृह : अग्निशमन दलाचा परवाना नाही.

बेलापूर रस्त्यावरील वेस : निधीची कमतरता.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा.