शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:05 IST

७८८ पैकी १७ अर्ज अवैध, ७७१ अर्ज ठरले वैध

Ahilyanagar Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ५४ उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेला छाननीत चांगलाच धक्का बसला. या पक्षाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. अर्जावर अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी केल्याने एक, एबी फॉर्म न जोडल्याने एक, एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने एक तर एबी फॉर्मवर खाडाखोड केल्याने दोन असे एकूण पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे शिंदेसेनेचे निवडणूक मैदानात आता ४९ उमेदवार राहिले आहेत.

शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी ११ पासून उमेदवारी अर्जाची छाननी सुरू झाली होती. बहुतांशी प्रभागातील उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप नोंदविला. महापालिकेचा कर थकविला, रस्त्यात अतिक्रमण केले, अवैध बांधकाम केले, अनुमोदकाची स्वाक्षरी चुकीची, अर्जाच्या प्रस्तावकाची खोटी स्वाक्षरी केली अशा स्वरुपाच्या तक्रारी होत्या. दाखल सर्व तक्रारींवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुनावणी घेत तक्रारींची पडताळणी केली. ज्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले ते अर्ज अवैध ठरविण्यात आले. अंतिमतः ७८८ पैकी १७ अर्ज अवैध ठरले असून ७७१ अर्ज ठरले वैध ठरले आहेत.

वाकळेंविरोधात १ 

अपक्ष १७ पैकी बहुतांशी प्रभागात उमेदवारांची मोठी गर्दी असताना प्रभाग ८ मधील ड मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार कुमार वाकळे यांच्या विरोधात एकमेव अपक्ष उमेदवार पोपट मुरलीधर कोलते यांचा अर्ज आहे.

शिंदेसेनेतील यांचे अर्ज ठरले बाद

प्रभाग आठमधील शिंदेसेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात आला. अनुमोदकाच्या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर ती चुकीची असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला नव्हता. प्रभाग ६ मध्ये विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा शिंदेसेनेकडून उमेदवारीचा अर्ज अवैध ठरला तर त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग ६ मधील उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यांचा शिंदेसेनेचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग १६ मध्ये हर्षवर्धन कोतकर यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा शिंदेसेनेकडील अर्ज अवैध ठरवण्यात आला. अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग १७ मध्ये गौरी नन्नावरे यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा शिंदेसेनेचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. अपक्ष अर्ज वैध ठरला.

'त्या' उमेदवारांना पुरस्कृत करणार 

छाननीमध्ये आमचे जे उमेदवार बाद ठरले आहेत व ज्यांचे अपक्ष उमेदवार अर्ज आहेत त्यांना तसेच ज्यांनी आमच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती मात्र, ऐनवेळी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांना आमच्या पक्षाच्यावतीने पुरस्कृत केले जाणार असल्याचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचा एक अर्ज गेला 

प्रभाग ८ मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूरखा फत्तेखा पठाण यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचक अन्य प्रभागातील असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला.

छाननीत शिंदेसेनेचा अर्ज ठेवला

प्रभाग १६ मधील सुनीता संजय कोतकर यांनी उद्धवसेना व शिंदेसेना अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीच्यावेळी त्यांनी शिंदेसेनेकडील अर्ज कायम ठेवला. त्यामुळे उद्धवसेनेच्या यादीतील एक उमेदवार घटून त्यांची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या आता २३ झाली आहे.

घाईच ठरली घातक

शिंदेसेनेचे पाच अर्ज अवैध ठरविण्यात आले. अन्य पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदेसेनेकडे उमेदवारीसाठी काही जणांनी संपर्क केला. त्यामुळे उपलब्ध असलेल्या एबी फॉर्मवर खाडाखोड करून व्हाईटनर लावून उमेदवारांची नावे टाकण्यात आले, तर काहींना एबी फॉर्मची झेरॉक्स देण्यात आली. त्यामुळे छाननीत हे अर्ज अवैध ठरले.

मोहिते, गाडळकरांच्या अर्जाबाबत उशिरापर्यंत सुनावणी

प्रभाग १५ मधील भाजपचे उमेदवार सुजय अनिल मोहिते व दत्तात्रेय सोमनाथ गाडळकर यांच्या अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for Shinde Sena: Five Candidacy Applications Rejected

Web Summary : Shinde Sena faced a jolt as five candidacy applications were rejected due to errors in AB forms and signatures. Consequently, 17 applications were deemed invalid out of 788, leaving 771 valid for Ahilyanagar Municipal Corporation Election 2026.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Ahilyanagar Municipal Corporation Electionअहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदे